डॉ. धर्मकारे यांच्या मारेकऱ्यास व सूत्रधारास तात्काळ अटक करण्याची विविध संघटनांची एकमुखी मागणी

Read Time:2 Minute, 36 Second

नांदेड दि.१३ -उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात सेवेत असलेले डॉ.हनुमंत धर्मेकर यांच्यावर मंगळवारी अज्ञात मारेकर्‍यांनी चार गोळ्या झाडून निर्घृण खून केला व आरोपी फरार झाले पोलिस प्रशासनाने अद्याप मारेकरी व संबंधितांना अटक केली नसल्याने समाजातील विविध पक्ष संघटनांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी नांदेड यांना आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे अशी एकमुखी मागणी केली आहे.

डॉक्टर धर्मेकर हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असून ते मागासवर्गीय समूहातील आहेत. दरम्यान काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत नातलगांसह विविध सामाजिक राजकीय संघटनांनी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनही केले. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. धर्मेकर यांच्या पत्नीस शासकीय सेवेत सामावून घेण्याची ही मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा महासचिव श्याम कांबळे, लोकस्वराज्य आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे, बिएसपी चे जिल्हा प्रभारी लोकेश कांबळे, आर पी एफ चे प्रदेशाध्यक्ष मनोज कुमार वाघमारे, राज्यसचिव मोहन यादव, शिवसेना उपशहरप्रमुख राहुल तेलंग, दलित महासंघाचे उत्तम गवाले, पंचायत समिती नायगाव चे नामदेव कांबळे, भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे गंगाधर कावडे, अर्जुन गायकवाड, गंगाधर जाधव, संदीप मेटकर, सचिन गरजे, अशोक गारुळे, साहेबराव गुंडीले,भारिप चे उत्तम मोगले दिपक कसबे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × two =