डॉ. अभिजित चौधरी औरंगाबाद मनपाचे नवे आयुक्त

Read Time:56 Second

मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, औरंगाबाद महापालिका आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी यांची बदली झाली आहे. यासोबतच नाशिक मनपा आयुक्तांचीही बदली झाली असून, येथे डॉ. चंद्रकांत पोलकुंदवार हे मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

याशिवाय सांगली, सातारा आणि पालघरच्या जिल्हाधिका-यांची बदली झाली असून, सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची, सातारा जिल्हाधिकारीपदावर रुचेश जयवंशी यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून जी. एम. बोडके यांची बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =