डॉक्टर, नर्सेसना देशभर मोफत विमान प्रवासाची सुविधा; विस्तारा एअरलाईन्सची घोषणा

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या संकट काळात डॉक्टर्स आणि नर्सेसना देशभरात मोफत प्रवासाची सोय देण्याचा निर्णय विस्तारा एअरलाइन्सने जाहीर केला आहे. मनीकंट्रोल डॉट कॉमने याबद्दलचे वृत्त दिले आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांना एक पत्र लिहून विस्तारा एअरलाइन्सने याची माहिती दिली आहे.

आम्ही या संकटकाळात सरकारी संस्था, हॉस्पिटल्सना हवाईमाल वाहतुकीत सा करू इच्छितो. आम्ही या संदर्भात सरकारमान्य संस्था, तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या अशा गरजापूर्ण करण्यात आम्ही साहाय्य देऊ इच्छितो. आम्ही आमच्या विमानांमध्ये उपलब्ध जागेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त साहाय्य करण्याचा प्रयत्न करू, असे विस्तारा एअरलाइन्सने पाधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे़.

उषापाधी यांनी असे पत्र आल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. सरकारी संस्था आणि हॉस्पिटल्सची तातडीची गरज लक्षात घेऊन विस्तारा हवाई माल वाहतूक सेवा देणार आहे. तसेच, कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सेसना देशभरात मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा प्रस्तावही कंपनीने ठेवला आहे. आपण सगळे मिळून या संकटाचा सामना करू, असे पाधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सीट्सची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊन आम्ही प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर वैद्यकीय व्यावसायिकांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देऊ, असेही विस्ताराने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विस्तारा एअरलाइन्स हा टाटासन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे. २०१५ पासून ही एअरलाइन्स सुरू झाली. देशातली बिकट परिस्थिती पाहून अनेक खासगी कंपन्यांनी शक्य त्या मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात टाटा कंपनी आघाडीवर आहे. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय नुकताच टाटा ग्रुपने घेतला.

त्यामुळे देशाला सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास हातभार लागणार आहे. महिंद्रा ग्रुपनेही अशाच प्रकारे वेगवेगळया प्रकारची मदत करून देश संकटातून बाहेर येण्यासाठी हातभार लावला आहे. आपल्या कंपनीची रिसॉर्टस कोविड सेंटर म्हणून वापरण्यास देणे, आपल्या कंपन्यांमध्ये व्हेंटिलेटर्सची निर्मितीकरणे, अर्थसा करणे वगैरे उपक्रम महिंद्रा कंपनीने राबवले. आणखीही अनेक कंपन्यांनी आपापल्या परीने अशी मदत देऊ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 5 =

vip porn full hard cum old indain sex hot