डॉक्टर धर्मकारे हत्याकांडाची एसआयटी मार्फत चौकशीची विविध संघटनांची मागणी

Read Time:2 Minute, 45 Second

नांदेड दि.२४- उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांचे मागील आठवड्यात हत्या करण्यात आली होती त्यांच्या त्यामागे उमरखेड पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार अजून मोकळे असल्यामुळे त्यांचे एसआयटी मार्फत चौकशी करून तात्काळ अटक करण्याची मागणी डॉक्टर धर्मकार्य हत्या विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री व गृहराज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याच मागणीसाठी कृती समितीमार्फत आज नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले होते.

डॉक्टर धर्मकार्य हत्या विरोधी कृती  समितीने नांदेड बंद सह तरोडा नाका येथून निषेध मोर्चा काढत व बाजारपेठा बंद करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे हा त्यामागील प्रमुख सूत्रधार आस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह एसआयटी चौकशीची मागणी केली. तर डॉक्टर हनुमंत धर्मकारे ची हत्या व्यावसायिक स्पर्धेतून झाली असल्याचा संशय धर्मकारे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

या निषेध मोर्चात कृती समितीच्या सदस्यांसह बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनिष कावळे रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक रमेश सोनाळे बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर रविदासीयाचे चंद्रप्रकाश देगलूरकर प्रा.डाॅ.ना.तु. खंदारे, रामराव महाराज भाटेगावकर, लोकस्वराज आंदोलन चे रामचंद्र भरांडे, वंचित बहुजन आघाडी च श्याम कांबळे परमेश्वर बंडेवार व्यंकटेश धर्मकारे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × one =