
डेल्टा प्लस व्हेरीअंटचा महाराष्ट्रात शिरकाव, या जिल्ह्यांमध्ये आढळले रुग्ण
कोरोनाच्या विषाणुमध्ये ऊत्परीवर्तन होऊन नव्याने संक्रमण वाढत आहे. भारतात कोरोनाचा डेल्टा व्हेरीअंट दुसरी कोरोनाची लाट येण्यास कारणीभूत ठरला होता. ईतर देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरीअंट आढळून आला असून भारतातसुद्धा डेल्टा प्लस कोरोनाचा विषाणु आढळू शकतो व हा डेल्टा प्लसच तीसरी लाट येण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरीअंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये या व्हेरीअंटचे निदान झाले आहे. आता हा नविन व्हेरीअंटर कुठपर्यंत पसरला आहे याचा शोध घेण्याकरिता मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे.
मोमोक्लोनल एन्टीबॉडी कॉकटेल ऊपचारपद्धती या व्हेरीअंटचा प्रतिकार करु शकते का याकरिता संशोधन सुरु आहे. डेल्टा प्लस व्हेरीअंट नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी या परिसरातून आलेल्या नमुन्यांमधून आढळून आला असल्यावर वैद्यकीय संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनीसुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे. आम्ही अजून नमुने गोळा करीत आहोत, अंतिम अहवाल येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरीमध्ये ज्यांच्यामध्ये डेल्टा प्लसचा व्हेरीअंट आढळून आला त्यांना सद्यस्थितीत कोरोनाची कुठलिही लक्षणे नसल्याचे रत्नागिरी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्र गावडे यांनी सांगीतले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या महाराष्ट्रात सर्वाधीक रुग्णसंख्या आढळून येते आहे. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या व्हेरीअंटचा फैलाव झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.
डेल्टा प्लस व्हेरीअंटमुळेच महाराष्ट्रात तीसरी लाट येणार असल्याचा अंदाज टाक्स फोर्सने व्यक्त केला होता. आता दोन ते तीन आठवड्यात महाराष्ट्रात तीसरी येऊ शकते असा अंदाक काही वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.