August 19, 2022

डिजिटल इंडियामुळे देश प्रगतीपथावर

Read Time:3 Minute, 31 Second

डिजिटल इंडियामुळे देश प्रगतीपथावर जातोय. पारदर्शक आर्थिक व्यवहारामुळे तरुणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.डिजिटल व्यवहार ही वस्तुस्थिती मान्य करून उद्योजकांनी त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी बँकिंग क्षेत्रातल्या विविध संकल्पनांचा अभ्यास करावा. ई कॉमर्स व डिजिटल या संकल्पनांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे आणि परकीय उद्योजक गुंतवणूक करीत आहेत. त्या वस्तूंचे उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन यमाजी मालकर यांनी केले.

कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच कोल्हापूर व कोकण विभाग व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय २२ वे वार्षिक ऑनलाईन अर्थशास्त्र व सहकार परिषदेचे उद्घाटक म्हणून मालकर बोलत होते.
कोरोना सरख्या महामारीत शेतातील निर्यात उत्पादनामुळे आपण सर्वजण तरलो आहोत, असे सांगून मालकर म्हणाले की, ऐंशी कोटी नागरिकांना आठ महिने फुकट अन्नधान्य वाटप आपण करू शकलो. या सर्व गोष्टींचा विचार करून अन्नाची सुरक्षितता हा अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी म्हणाले की, नवीन आर्थिक बदलांकडे तरुणांनी डोळसपणे व सकारात्मक दृष्टीने पाहावे. त्या बदलांचा अंगीकार करावा, असे सांगीतले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, जगन्नाथ पाटील, परिषदेचे अध्यक्ष शरद शेटे, उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी यथोचित मार्गदर्शन केले. अर्थवेद स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या अधिवेशनासाठी ऑनलाईन पद्धतीने १५० शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. तर प्रत्यक्ष ४५ शिबिरार्थी उपस्थित होते. उदघाटन समारंभाचे प्रास्तविक प्रा. दिनेश जोशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोपाळ बाहेती यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. बालाजी घुटे यांनी केले. यावेळी सचिव प्रा. अनिल निर्मळे, सहसचिव प्रा. विजय मिटकरे, सदस्य प्रा सतीश जंगम आदी उपस्थित होते.

अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख, डॉ. शैलजा दामरे, विकास खोगरे, प्रीतम मुळे, निकिता पुणे, आदित्य कुलकर्णी, प्रसाद कोल्हे, प्रांजली भोंग, रमेश दगडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + eighteen =

Close