डाक विभागाच्यावतीने मतदान जनजागृती – VastavNEWSLive.com


 

नांदेड ,(जिमाका)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप सहभाग कार्यक्रमातंर्गंत डाक विभागाच्यावतीने 22 एप्रिल रोजी मतदान जन जागृती रॅली काढण्यात आली होती. ही रॅली नांदेड प्रधान डाकघर परिसरापासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीत नांदेड शहरातील सर्व टपाल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी डाक विभागाच्यावतीने विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच डाक विभागाचे पोस्टमन, कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाबद्दल जागरुक केले जात आहे. सर्व टपाल कार्यालयामध्ये मतदानाबद्दल नागरिकांना जागरुक करण्यासाठी बॅनर्स, सेल्फी बूथ लावण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना मतदानाविषयी जागरूकता येईल.


Post Views: 28


Share this article:
Previous Post: विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र दिन पुर्वतयारीबाबतचा आढावा

April 24, 2024 - In Uncategorized

Next Post: ग्रामसेवक प्रेमसिंग आडे अडकला 5 हजारांच्या लाच जाळ्यात

April 24, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.