टेंशन वाढलं! उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर मूळ शिवसेना(Shivsena) कोणाची हा वाद सातत्यानं चर्चेत येत आहे. हा वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वाेच्च नायालयासमोरील एक मोठं आव्हान ठरत आहे. त्यातच आता ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख पदाची शप्पथ घेतली होती. त्यामुळं त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण होत आहे, त्यामुळं ठाकरे गटाचं पुढं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळं ठाकरे गटासमोर काय अडचणी येतील आणि यावर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई(Anil Desai) यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. हेच या आर्टिकलमधून सविस्तर जाणून घेऊयात.
आमच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष प्रमुख पदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडं केली आहे. यात राष्ट्रीय कार्यकरणीची निवडही आहे असं स्पष्टीकरण अनिल देसाईंनी दिली आहे. जर निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदाची मुदत निर्णय होईपर्यंत वाढवावी, असं देसाई म्हणाले आहेत.
ठाकरे गटासाठी पक्षप्रमुखांची ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. कारण सध्या एकनाथ शिंदेंकडं खासदार आणि आमदारांचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळं जर एकनाथ शिंदेनी पक्ष प्रमुखपदाच्या निवडणुकीत काही शक्कल लढवली तर बहुमत ठाकरेंच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामळं पक्षप्रमुख हे पदही ठाकरेंच्या हाततून जाण्याची शक्यता आहे.
महत्वाचं म्हणजे संघटनात्मक प्रमुख निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाल विनंती करण्यात आली आहे. परंतु मंगळवारी आयोगानं यावर कोणतीही प्रक्रिया दिली नाही. आता यावर एका आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. आता निवडणुक आयोग काय प्रतिक्रिया देईल ठाकरे गटाचं लक्ष लागलं आहे.
आता उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे, हा मुद्दा अचानकच कसा चर्चेत आला, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, मंगळवारी मूळ शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा यावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाच्या वकिल महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना ठाकरेंचं पक्षप्रमुख पदच बेकायेदशीर असल्याचं सांगितलं. युक्तिवाद करताना ते म्हणाले की, शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेबांनी तयार केली आहे. ते हयात असतानाच उद्धव ठाकरेंना पक्ष कार्यध्यक्षपद देण्यात आलं होतं. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीनं पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता पक्षसंघटनेत अनेक बदल केले. त्यामुळं ठाकरेंचं पक्षप्रमुख पदचं बेकायदेशीर आहे. शिंदें गटाच्या वकिलांनी केलेल्या या युक्तिवादानंतर उद्वव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे, हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला