January 19, 2022

टीव्ही पाहणे महागणार; चॅनल्ससाठी मोजावे लागणार ज्यादा पैसे!

Read Time:2 Minute, 22 Second

नवी दिल्ली: पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सोबत खाद्य तेल सुद्धा प्रचंड महाग झाले आहे. महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे. अर्थात, टीव्ही पाहण्यासाठी आता चॅनल्ससाठी ५० टक्के जास्त खर्च करावा लागणार आहे.

ट्रायच्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किमती वाढवण्यात येणार आहेत. ही दरवाढ येत्या १ डिसेंबर २०२१ पासून लागू करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग चॅनेल स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, स्टार, सोनीसह काही प्रादेशिक चॅनेलने काही चॅनेल्स आपल्या बुकेतून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणा-या ग्राहकांना ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किमती वाढवण्यात येणार आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने मार्च २०१७ मध्ये टीव्ही चॅनल्सच्या किमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर जारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या चॅनेलच्याकिंमती बदलत आहेत. एसपीएन चॅनेल पाहण्यासाठी आता मंथली ७१ रुपये मोजावे लागणार आहेत. आधी हे चॅनेल पाहण्यासाठी ३९ रुपये मोजावे लागत होते. झी साठी ४९ रुपये मोजावे लागू शकते. आता यासाठी फक्त ३९ रुपये मोजावे लागते. व्हायाकॉम १८ साठी मंथली ३९ रुपये मोजावे लागू शकते. आता यासाठी २५ रुपये मोजावे लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + fourteen =

Close