August 19, 2022

टायगर श्रॉफने केले दिशाच्या ‘एक व्हिलन रिटर्न’चे कौतुक

Read Time:2 Minute, 0 Second

मुंबई : मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सर्वत्र चालू होती. ६ वर्षांच्या नात्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्या दरम्यानच दिशा पटानीचा ‘एक व्हिलन रिटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.०५ कोटींची कमाई केली. दरम्यान, या चित्रपटाची एक स्टोरी शेअर करत अभिनेता टायगर श्रॉफने दिशा पटानी, अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि जॉन अब्राहम यांचे कौतुक केले आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘एक व्हिलन रिटर्न’चे एक पोस्टर शेअर करत सोबतच त्याने लिहिले की, काय मनोरंजक चित्रपट आहे आणि पूर्ण कास्टने सुंदर अभिनय केला आहे. सगळ्यांना अभिनंदन. टायगर श्रॉफने आपल्या पोस्टमध्ये दिशासोबतच पूर्ण कास्टला आणि दिग्दर्शकांना टॅग केले आहे.

दिशा आणि टायगरचे ब्रेकअप
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपबाबत चर्चा चालू होत्या. टायगरच्या मित्राने याबाबत खुलासा केला होता. मीडिया रिपोर्टस्च्या मते, दिशाने टायगरकडे लग्नाबाबत विचारले होते. मात्र टायगरने दिशाला सांगितले की, तो अजून लग्नासाठी तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × four =

Close