January 19, 2022

टाइम मॅग्झीनवर झळकले मोदी, ममता

Read Time:3 Minute, 18 Second

न्यूयॉर्क : टाइम मॅग्झीनने जगातील सर्वाधिक १०० प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी जाहीर केली. बुधवारी ही यादी जाहीर केली गेली. टाइमच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांचाही समावेश आहे.  २०२१ च्या प्रभावी नेत्यांच्या यादीत सर्वात धक्कादायक नाव आहे ते तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादरचे. अफगाणिस्तानमधील वर्तमान तालिबान सरकारमध्ये बरादरना उपपंतप्रधान पद दिले गेले आहे.

टाइमने जारी केलेल्या २०२१ च्या यादीत १०० प्रभावशाली नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग, ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि मेघन यांचाही समावेश आहे. याशिवाय अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेफ्टाली बेनेट, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम इईसी आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचीही नावे आहेत.

तालिबानचा नेता अब्दुल गनी बरादर तीन वर्षांपूर्वी तुरुंगातून सुटला. अफगाणिस्तानमध्ये गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या लढाईत विजेता म्हणून उभारला. जगातील प्रत्येक देशासोबतच्या चर्चेत तालिबानने बरादरला समोर केले आहे. अफगाणिस्तानमधील उरूजगान प्रांतात डेह राहवूद हा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील वितमाक गावात १९६८ मध्ये बरादरचा जन्म झाला होता. अब्दुल गनी बरादर हा दुर्रानी पश्तून आहे. किशोर अवस्थेत असताना मुल्ला उमरशी त्याची मैत्री झाली होती, असे बोलले जाते.

अब्दुल गनी बरादर हा कट्टर धार्मिक आहे. १९८० च्या दहशकात बरादर सोव्हिएत संघाविरोधात अफगाण मुजाहिद्दीन म्हणून लढाई लढला. १९९२ मध्ये रशियाने माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सरदारांमध्ये गृहयुद्ध रंगले. यानंतर बरादर ने माजी कमांडर मुल्ला उमरसोबत मिळून एक मदरसा स्थापन केला. मुल्ला उमरनंतर तालिबानचा दुसरा नेता अब्दुल गनी बरादरला तेव्हाही विजयाचा नायक मानले गेले. तालिबानसाठी बरादरनेही रणनीती बनवली होती. बरादरने तालिबान ५ वर्षांच्या सत्तेत सैन्य आणि प्रशासनिक भूमिका बजावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 14 =

Close