झायडसच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

Read Time:2 Minute, 44 Second

मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिस-या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी कंपनी झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड-१९ वरील लस झायकोव्ह-डीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे़

झायडस कॅडिलाची लस कोविड-१९ विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिला लसची चाचणी २८,००० हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.

बंगळुरूस्थित औषधनिर्माण कंपनी झायडस कॅडिलाने दिलेल्या माहितीनुसार, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाल्याने कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील पाचवी उपलब्ध लस आहे.

तीन डोसची लस
डीएनए-प्लाज्मिड आधारित झायकॉव्ह-डी लसचे तीन डोस असतील. लस दोन ते चार डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते आणि कोल्ड चेनची आवश्यकता नसते. याद्वारे त्याची खेप सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी विभागांतर्गत बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या (बीआयआरएसी) नॅशनल बायोफार्मा मिशन (एनबीएम) यांनी लसीला पाठिंबा दर्शविला आहे. क्लिनिकल ट्रायलमधून दिसून आले आहे की लस मुलांसाठीही सुरक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + thirteen =