ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन

Read Time:1 Minute, 54 Second

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (९२) यांचे शनिवारी निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. एकेकाळी प्रचंड गाजलेला मराठी चित्रपट पिंजरामध्ये वत्सला देशमुख यांनी भूमिका साकरली होती. या चित्रपटातील त्यांचे संवाददेखील चांगलेच गाजले होते. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये वत्सला देशमुख यांनी प्रमुख अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. याशिवाय, आई, मावशी, काकू, आत्या, आजी अशा अनेक भूमिकादेखील त्यांनी साकारलेल्या आहेत.

वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख हिच्या आई होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते. पण ख-या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती सुहाग या चित्रपटातून. त्यावेळी त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते. मग त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटातसुद्धा काम केले होते. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =