“ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफडं, त्यांनाच आम्ही आय लव्ह यू म्हटलो”

Read Time:2 Minute, 6 Secondमुंबई | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का? असा सवाल उपस्थित करत ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं.

आम्ही बाळासाहेबांना सोडलेलं नाही, आम्ही दिघेंना सोडलेलं नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही भगवा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आम्ही फक्त आमच्यासोबत जो राहिल तो आमचाच असं बोललो मात्र आता मैदानावरुन लढाया, दसरा मेळाव्यावरुन लढाया.. काय चाललंय, असं म्हणत दसरा मेळाव्याच्या वादावरून गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

अनेक पुढारी आता सीझनेबल असतात, ज्याप्रमाणे छत्री पावसात वापरतो त्याप्रमाणे हे सीझनेबल पुढारी फिरत असतात. त्यामुळे आता राजकारणात कायम फिरावं लागत, अशी टोलेबाजी गुलाबराव पाटलांनी यावेळी बोलताना केली.

काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता?; हा बडा नेत्या भाजपच्या वाटेवर?

सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!Leave a Reply

Your email address will not be published.

4 × four =