“जो उगवत नाही, फुलत नाही असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे”

Read Time:2 Minute, 23 Second


मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधक वेदांताबद्दल बरेच बोलतात. आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलता ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण असाही चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि वास येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे. बाकी कुठं नाही. त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली. महाराष्ट्र कसा सहन करत होता, मला कळतं नाही, असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

मला त्यांनी उत्तर द्यावं. अडीच वर्षात तुम्ही कोणती योजना राबविली. गरिबांचं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं. मुंबईत निरक्षरतेचं प्रमाण 18 टक्के आहे. दारिद्रे रेषेखालचं प्रमाण 31 टक्के आहे. दरडोई उत्पन्न दोन लाख 84 आहे. गोव्याचं दरडोई उत्पन्न पाच लाखांच्या जवळ आहे. उत्तरेकडच्या एका राज्याचं साडेचार लाख आहे. काही राज्यांचं साडेतीन लाख आहे. आपलं दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी यांनी काय केलं, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

दरम्यान,  साहेब साहेब होते. साहेबांच्या नखाची सर नाही हो या माणसाला. बाळासाहेब आग होते. या माणसाला कोळसा नाही म्हणू शकत, अशी टीकाही राणे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

थोडक्यात बातम्या- 

‘…नाहीतर मी हिमालयात जाईन’; चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

असं भारतीय साम्राज्य ज्याचा विस्तार श्रीलंकेपासून ते थेट कंबोडियापर्यंत होता, आता येतेय फिल्म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =