जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांना मोठा झटका!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांच्या जामीनाला आता येत्या 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तुर्तास तरी दिलासा मिळणार नाही.
अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता पण CBI ने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी CBI ची विनंती स्वीकारली आहे. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला हायकोर्टानं जामीन दिला होता.
जामीन मंजूर मात्र CBI विनंतीनुसार अंमलबजावणी साठी 10 दिवस स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी CBI नं परत मागितली वाढीव मुदत मागितली होती.
CBI ची विनंती व्हेकेशन असल्यानं सर्वोच्च न्यायालयात अपिलात जाण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण, यापुढे कोणतीही मागणी मान्य करणार नाही, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-