जेनिफर विंगेटवरच्या प्रेमाची कबुली देत अभिनेत्याने व्यक्त केली ‘ही’ ईच्छा

Read Time:2 Minute, 12 Secondमुंबई। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेटनं अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय ‘बेहद’ या टीव्ही सीरिअलमधून तिला जास्तं प्रसिद्धी मिळू लागली. आपल्या व्यक्तीमत्वाने आणि अभिनयाने ती प्रेक्षकांना नेहमी भुरळ घालत असते. तसंच सुंदरतेच्या बाबतीत सुद्धा ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. (Televsion Actress Jennifer Winget)

                                                                                                                                                                                             

जेनिफरने खूप कमी वेळात आपली प्रसिद्धी टीव्ही मालिका शोमधून मिळवली. ‘बेहद’ सारख्या अनेक टेलिव्हिजन सिरीयल मध्ये तिने काम केलं. ‘बेहद’ मध्ये सुद्धा जेनिफर मुख्य भूमिकेत दिसली.

आपल्या दमदार अभिनयानं आणि अदांनी प्रेक्षांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वातलं मोठं नाव आहे. तिच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीमधील सेलिब्रेटी सुद्धा फिदा आहेत.

बिग बॉस 13 मधील अभिनेता विशाल सिंह हा जेनिफरच्या प्रेमात वेडा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, भविष्यात मला कधी संधी मिळालीच तर मी नक्की जेनिफरला डेट करेल. पुढे तो असं देखील म्हणाला की, माझं मन, आत्मा सर्वकाही जेनिफरच्या प्रेमात आहे.

या सोबतच त्याने ही सुद्धा कबुली दिली की , तो जेनिफरला सोशल मीडियावर स्टॉक करत असतो आणि तिची प्रत्येक पोस्ट तो आवर्जून पाहत असतो.

 

Tags-

 

jennifer winget instagram,

jennifer winget facebook,

jennifer winget wikipedia,

jennifer winget new show,

 Leave a Reply

Your email address will not be published.

2 + 8 =