जुन्या नांदेड भागातील मारोती मंदिराची दानपेटी फोडली


नांदेड(प्रतिनिधी)-मारवाडगल्ली सराफा भागातील मारोती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील ऐवज लंपास केला आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेतील गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
जुन्या नांदेड भागातील सराफा मार्केटच्या पाठीमागील मारवाडगल्लीमध्ये सालासर हनुमान मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत छोट्‌याशा गल्लीत आहे. आज पहाटे या मंदिराचे पुजारी पुजा करण्यासाठी आले असतांना मंदिराचे दार तोडलेले होते. सोबतच दानपेटी सुध्दा फोडलेली होती. त्यातील काही नाणी खाली पडलेली होती.या दानपेटीतील एकूण ऐवज किती होता याची माहिती प्राप्त झाली नाही. परंतू मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली आहे हे नक्की.वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाने गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.


Post Views: 104






Share this article:
Previous Post: 40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद

June 24, 2024 - In Uncategorized

Next Post: बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन

June 25, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.