जिवे मारून गेम पुर्ण केल्याची कबूली , किरकोळ भांडणाच्या कारणामुळे केला खून

Read Time:3 Minute, 21 Second

लातूर : प्रतिनिधी

रोहन उजळंबेच्या मित्रासोबत अल्पवयीन मुलाचे दीड महिण्यापूर्वी भांडण झाले होते. मला कसे काय मारले तो राग मनात धरून त्या भावनेतून खुन्नस पुर्व तयारी करून रोहन उजळंबे यास जिवे मारून गेम पुर्ण केला, अशी कबूली अल्पयीन मुलाने दिल्याचे पोलिस प्रशासनाने पत्रकाद्वारे प्रसिध्दीस दिले असून एमआयडीसी पोलिसांनी खून करणा-या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

साई मंदिर जवळ, विशाल नगर लातूर येथे रोहन सुरेश उजळंबे, (वय १८ रा. लोदगा ता. औसा ह. मु. सुपारी हनुमान मंदिराजवळ, मोती नगर लातूर) यास अनोळखी व्यक्तीने कत्तीने डोक्यात, उजवी गालावर चेह-यावर मारून गंभीर जखमी केले होते. त्यास उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून आरोपींना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यासाठी योग्य त्या सूचना देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे व पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन आरोपीचे शोध कामी सोलापूर व पुणे जिल्हयात रवाना केले. तसेच गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके ठिकाणी छापेमारी करून कसून शोध घेत होते.

दरम्यान पोलीस आपला शोध घेत आहेत. आता आपण लपून राहू शकत नाही असे लक्षात आल्याने गुन्हयातील आरोपी पुणे येथून लातूरकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकास मिळाली. त्यावरून सदर पथकाने गुन्हयातील आरोपी पीव्हीआर चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता तो अल्पवयीन असल्याचे आढळले. त्यावरून नमूद अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांस बोलावून घेऊन त्यांचे समक्ष विचारपूस करून त्यास आज दि. २५ जानेवारी रोजी सकाळी एका खाजगी गाडीतून प्रवास करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + 4 =