जिल्ह्यात ३ व्यक्ती कोरोना बाधित

Read Time:2 Minute, 3 Second

नांदेड: प्रतिनिधी
जिल्ह्यात प्राप्त झालेल्या १ हजार ८८ अहवालापैकी ३ अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २ तर अँटिजेन तपासणीद्वारे १ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार ४९९ एवढी झाली असून यातील ८७ हजार८२३रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला २२ रुग्ण उपचार घेत असून२ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५४एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण १ हिंगोली १ तर अँटिजेन तपासणीद्वारे किनवट १ असे एकुण 3 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील ३ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुस-्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 5 =