जिल्हा बँकेत भरला १२ कोटींवर पीक विमा

Read Time:3 Minute, 22 Second

लातूर : पंतप्रधान खरीप पीक विमा २०२२ अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०१ शाखांतून शेवटच्या दिवशी १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ७८९ हजार शेतक-यांनी १२ कोटी १९ लाख १५ हजार रुपयाचा पीक विमा भरणा केला, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मंगळवारी दिली. जिल्ह्यातील शेतक-यांना पीक विमा भरण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शाखा स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यालयातील अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले होते. सोमवारी शेवटच्या दिवशीपर्यंत खालील तालुक्यातील विविध शाखांत पीक विमा भरणा झालेला आहे.

जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील ८ हजार ९१२ शेतक-यांनी १ कोटी ११ लाख ७३ हजार रुपये, रेणापूर तालुका ५ हजार ५५७ हजार शेतक-यांनी ६२ लाख ९ हजार रुपये, औसा तालुक्यात १३ हजार ४२६ शेतक-यांनी १ कोटी ४४ लाख २८ हजार, निलंगा तालुक्यात १६ हजार १६६ शेतक-यांनी १ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपये, चाकूर तालुक्यात १६ हजार ३५८ शेतक-यांनी १ कोटी ६७ लाख ५७ हजार, अहमदपूर तालुक्यात ६ हजार ६८३ शेतक-यांनी ९३ लाख २५ हजार, उदगीर तालुक्यात १८ हजार ८४३ शेतक-यांनी २ कोटी ४४ लाख ४३ हजार रुपये, देवणी तालुक्यात ७ हजार ५८८ शेतक-यांनी ८४ लाख ७७ हजार रुपये, जळकोट तालुक्यात २ हजार ९७५ शेतक-यांनी ३५ लाख ३४ हजार, तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ९ हजार २८१ शेतक-यांनी ९८ लाख १४ हजार रुपये पीक विमा भरणा जिल्हा बँकेच्या विविध शाखांत केला. मुदत संपेपर्यंत एकूण १ लाख ५ हजार ७८९ शेतक-यांनी १२ कोटी १९ लाख १५ हजार रुपये पीक विमा भरणा झालेला आहे

दोन दिवसांत विम्याची रक्कम भरणा जास्तीची
लातूर शहर, औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, निलंगा, जळकोट, उदगीर, अहमदपूर, देवणी, औसा तालुक्यातील विविध शाखांत शेतकरी सभासदांनी पीक विमा भरलेला असून सुटीच्या दिवशी अधिक शेतक-यांनी पीक विमा भरणा केला आहे. पीक विमा भरून घेण्यासाठी बँकेतील शाखा व्यवस्थापक, इन्स्पेक्टर, अधिकारी, कर्मचारी, गटसचिव, सोसायटीचे चेअरमन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + 10 =