जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश


नांदेड :- नांदेड जिल्‍हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं. 18 आणि 20 नांदेड, आयन डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 रोजी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.


Post Views: 6


Share this article:
Previous Post: तलवारीच्या धाकावर दुचाकी जाळली – VastavNEWSLive.com

June 14, 2024 - In Uncategorized

Next Post: बारुळ कौठा ता.कंधार येथे सहा दरोडेखोरांनी लुटून नेली लाखोंची रक्कम आणि लाखोंचे दागिणे

June 15, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.