जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेस प्रतिसाद

Read Time:1 Minute, 47 Second

परभणी: गीता जयंतीचे औचित्य साधून गीता परिवार परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय सायकल स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आज शिवाजी कॉलेज मैदान येथे पार पडली. प्रारंभी गीता परिवार कर्मठ कार्यकर्त्या स्व. सौ. वर्षा कालानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. ही स्पर्धा जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक तालुका पातळीवर व जिल्हा स्तरावर घेण्यात आली.

परभणी तालुका पातळीवर यामध्ये ८० मुलांनी सहभाग घेतला. यात चार गट करण्यात आले. पहिला गट शिशुवर्ग, दुसरा गट पहिली ते दुसरी, तीसरा गट तिसरी ते चौथी आणि चौथा गट पाचवी ते सहावी. स्पर्धेदरम्यान मुलांना खाऊच्या स्वरूपात बिस्किट, पॉपिंस, सरबत देण्यात आले. महाविद्यालयाचे प्रा. जाधव, प्रा. मोरे, प्रा. कोकीळ, प्रवीण यांचे सहकार्य मिळाले. यशस्वीतेसाठी जिल्हा गीता परिवार अध्यक्ष अ‍ॅड. सौ. कविता मानधने, सौ. माधुरी सराफ, सौ. सुनिता लोया, सौ. विद्या डागा, सौ. सरोज गटांनी, सौ. प्रिया दरक, नेहा दरक, निशा धुत, तृप्ति मनियार, सुनीता मानधने यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. सौ. पूजा बाहेती व डॉ. पवन चांडक यांचे सहाय्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − three =