August 19, 2022

जिल्हाधिकारी भर पावसात शेत-शिवारात

Read Time:1 Minute, 44 Second

उदगीर : तालुक्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी उदगीर तालुक्यातील मागील २ ते ३ दिवसांपासून सतत सुरू असणा-या पावसामुळे सद्यस्थितीत पिकांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी विविध गावातील शेतशिवारात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित शेतक-यांशी चर्चा केली. मादलापुर येथील नागेश गुरुनाथ आंबेगावे यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश सुळे, उदगीर तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळधिकारी शंकर जाधव, तलाठी देव प्रिय पवार कोतवाल ंिज्ांकलवाड, मंडळ कृषी अधिकारी देवनाळे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांंनी सोयाबीन उगवण संदर्भातील तक्रारी, कीड रोग उपाय योजना, गोगलगायीमुळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र व त्यासंदर्भातील केलेल्या उपाययोजना , फळबाग लागवड , बांबू लागवड इत्यादी विषयी आढावा घेऊन कृषी विभागास सूचना कृषी विभागास दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + seventeen =

Close