जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Read Time:2 Minute, 31 Second

मुंबई : मुलुंड पोलिसांनी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका वकिलाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. हे विधान आक्षेपार्ह असल्याचा दावा या वकिलाने तक्रारीत केला असून, पोलिसांनी आता त्याबद्दल अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान विषयी आपले मत व्यक्त केले होते. त्यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील त्यांनी टीका केली होती. तालिबान हे जंगली असून, त्यांचे कृत्य निंदनीय आहे. हे बोलताना पुढे ते असेही म्हणाले होते की, आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी देशातील एक मुस्लिम समुह देखील तालिबानचे समर्थन करतोय, असे विधान मुलाखतीत केले होते.

पुढे ते म्हणाले होते की, तालिबान आणि तालिबानसारखे बनण्याची ईच्छा ठेवणारे सारखेच आहेत. देशातील काही मुस्लिम समाजातील एक गट तालिबानचे स्वागत करतोय, असं म्हणत तालिबानचे समर्थन करणा-या लोकांवर त्यांनी टीका केली होती. जगभरातील उजव्या विचारसरणीचे लोक सारखेच आहेत. भारतात जमावाकडून होणा-यÞा मारहाणीच्या घटनांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, या घटना म्हणजे तालिबान बनण्याची फुल ड्रेस रिहर्सल आहे. हे लोक तालिबानच्या कृत्यांना स्विकारता आहे. हे सर्व एकच आहेत, फक्त नावाचा फरक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 5 =