July 1, 2022

जामीन मंजूर होताच राणांच्या अडचणी वाढल्या

Read Time:2 Minute, 53 Second

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाकडून आद खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने काही अटीशर्तींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. असे असले तरी आता मुंबई पालिकेनं राणा यांना नोटीस बजावली आहे. रवी राणा यांनी मुंबईतल्या घराचे बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने याप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा सुरु आहे.

आमदार रवी राणा आणि नवनीत राणा या दांपत्याने मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं चार मे रोजी म्हणजे आजच्या दिवशी मोजमाप करण्यात येईल अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्याने राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला. आता हा संघर्ष चांगला ताणला गेला आहे. महापालिकेने पाठवेल्या नोटीसमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेचं पथक आज खार येथील राणांच्या निवासस्थानी बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का, याचा तपास करणार आहे.

दरम्यान, राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अटी शर्तींसह या पती-पत्नींना जामीन मजूंर झाला असून न्यायालयाने त्यांना काही अटीशर्तीही घातल्या आहेत.

१२ दिवसांनंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दांपत्यांनी पून्हा अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नये. माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, असे केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + 6 =

Close