January 19, 2022

जानेवारीच्या तिस-या आठवड्यात पिक पॉईंट

Read Time:2 Minute, 15 Second

नवी दिल्ली : भारतात कोव्हिड १९च्या तिस-या लाटेचा पीक पॉईंट जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवड्यात बघायला मिळण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात जानेवारी महिन्याच्या मध्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरु यांनी केलेल्या संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांकडून संशोधनाच्या मॉडेलनुसार संसर्ग, लसीकरण आणि कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती विचारात घेत अंदाज बांधण्यात आला आहे. लोकसंख्येच्या ३० टक्के, ६० किंवा १०० टक्के लोक कोविड १९ विषाणूने संक्रमित झालेली असतील. संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटचा वापर करत अभ्यास केला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने देशाची चिंता आणखी वाढवली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या ९० हजार ९२८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − one =

Close