August 19, 2022

जागतिक वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची

Read Time:8 Minute, 2 Second

परभणी: आज वसुंधर दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्‍याची जबाबदारी सर्वावर आहे. शेती पुढे अनेक समस्‍या असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानास अनूकूल तंत्रज्ञान निर्मिती करावी. गेल्‍या पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्‍या बांधापर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

यावेळी उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठौर, स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आ. डॉ.राहुल पाटील, मफुकृविचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील, डॉ पंदेकृविचे कुलगुरू डॉ विलास भाले, राष्‍ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना भुसे म्हणाले की., कृषिच्‍या पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य केले पाहिजे. जागतिकस्‍तरावर डिजिटल शेतीचे वारे वाहत आहे,

देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव व ड्रोन यंत्राचा वापर वाढणार असुन यात मनुष्‍यबळ निर्मितीचे कार्य परभणी कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कार्य चालु आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या शेतमाल अधिक भाव मिळावा याकरिता शासनाच्‍या कृषि विभागाव्‍दारे विकेल ते पिकेल उपक्रम राबविण्‍यात येत आहे, शेतकरी बांधवाचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. शेतमालावर कृषि प्रक्रिया करून मुल्‍यवर्धनावर भर दिला जात आहे. महाराष्‍ट्र सरकार २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करित आहे. शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतक-यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. कृषी विभागाच्या ५० टक्के योजना महिला शेतक-यांसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. महिला बचत गट आणि शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना बळ देण्‍याचे कार्य शासन करित आहे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्‍तरावर कृषि विषयाचा समावेश करण्‍यात येणार असुन यात कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दिक्षांत भाषणात डॉ नरेंद्रसिंग राठौड म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने पन्नास वर्षांचा संस्मरणीय प्रवास पूर्ण केला असुन कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्ताराच्या माध्‍यमातुन कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे. कृषि क्षेत्रातील कुशल मनुष्‍यबळाची मागणी लक्षात घेऊन दजेर्दार शिक्षण देण्‍याची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. जागतिक स्‍पर्धेत कृषि विद्यापीठे उतरली पाहिजेत शेती पुढे हवामान बदलाचे मोठे आव्‍हान उभे असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन याची दाहकता कमी करता येईल. कृषि विद्यापीठातील संशोधनाची प्राध्‍यान्‍यक्रम ठरवावे लागतील, कृषि शिक्षण आणि उद्योग क्षेत्र संबंध वाढीवर भर दयावा लागेल. जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता, हवामान बदल, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षता, सकल देशांतर्गत उत्पादन वाढ आदींचा विचार करून कृषि अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. कृषि निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर करून उत्पादकता आणि नफा वाढवणे हे संशोधनाचे उद्दीष्‍ट असले पाहिजे. डिजीटल तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम शिक्षण प्रणालीच्‍या माध्‍यमातुन अध्यापन-अध्‍यायनाची गुणवत्ता सुधारावी लागेल. विद्यार्थ्यांमध्‍ये महाविद्यालयीन अभ्‍यासक्रमातच उद्योजकतेची बीजे रोवली गेली पाहिजे.

कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आदीचा वापर वाढणार असुन अभ्‍यासक्रमात याचा समावेश करावा लागेल. यावेळी कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या पन्‍नास वर्षातील कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचा आढावा मांडला. कृषिमंत्री भुसे यांच्‍या शुभ हस्‍ते बायोमिक्‍स निर्मिती केंद्राच्‍या नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन करण्‍यात आले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे आणि डॉ विणा भालेराव यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − 6 =

Close