January 25, 2022

जागतिक आरोग्य दिन…

Read Time:2 Minute, 17 Second

मित्रांनो 7 एप्रिल हा दिन जग भरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

आरोग्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची कश्या प्रकारे लूट होत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.सध्या स्तिथीत कोरोनाची लाट सर्वत्र पसरलेली आहे.या कोरोना महामारीवर उपाय म्हणून रेमडीसवीर ही लस खूपच महत्वाची आहे.रोज 2 लस घेणे गरजेचेच आहे.किमान 5 दिवस तरी ही लस घ्यावीच लागते 5 दिवस रोज 2 लस या प्रमाणे 14000 ही केवळ लसीची किंमत दवाखान्याच्या खर्च वेगळा.मार्केट मध्ये ही लस 1400 रुपयाला मिळायची पण सध्या याच लसीची किंमत 7000 ते 8000 केली आहे.मार्केट मध्ये लसीचा तुटवडा आहे म्हणून किंमती वाढवल्या आहे असे मेडिकल वाले सांगतात.

श्रीमंतांचे ठीक त्यांनी 7000 नाही 15000 हजार ला पण ही लस घेतील परंतु गरिबांचे काय? त्यांनी काय मरण्यासाठी जन्म घेतलाय ? गरिबांनी ही लस घेतली तरी अर्थिक दबावाखाली मरतील लस नाही घेतली तरी कोरोना मुळे मरतील.या लसीचे बाजारीकरण करणारे मग ते राजकारणी असो सरकारी अधिकारी असो वा आरोग्य सेवा देणारे,हे सर्वच जवाबदार आहेत या काळाबाजारात .

गेल्या वर्षी मार्च 2020 पासून लोकडाऊन लावून सर्वसामान्यांचे कमरडे मोडले आहे.छोटे व्यापारी तर व्यवसाय करावा की नाही हा त्यांच्या पुढे राहिलेला प्रश्न,खरच लोकडाऊन लावायचा असेल तर तर या लसीचे काळाबाजार करणाऱ्यांवर कायमचा लोकडाऊन लावावा.

#WORLD_HEALTH_DAY

या दिनाच्या शुभेच्या द्याव्या की नाही ?

-Vijay Ranvir, Nanded

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + nineteen =

Close