July 1, 2022

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित ९७० योजनांना मंजुरी

Read Time:2 Minute, 40 Second

प्रतिनिधी/सोलापूर

जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे 970 योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 3860 शाळा पैकी 3599 शाळांना व 4180 पैकी 4116 अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळ जोडणी देण्याबाबत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत 874 योजनांचे आराखडे मंजूर आहेत त्यापैकी 58 योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून त्या 58 योजनाची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजना चे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली. तसेच सन 2020-21मध्ये सोलापूर जिल्ह्याचे कार्यान्वित एक लाख 23 हजार 272 नळजोडणी चे उद्दिष्ट 103 टक्के पूर्ण केले असून सन 2021- 22 मध्ये घरगुती व कार्यान्वित उद्दिष्ट 75 हजार 551 होते त्यापैकी 32 हजार 972 इतकेपूर्ण केलेले आहेत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + twelve =

Close