August 19, 2022

जयश्री पावडे : गृहिणी ते महापौर

Read Time:4 Minute, 34 Second

राजकारणातील मोठ्या पदावर असणा-या स्त्रीयाविषयीड फार कुतूहल असतं .ही स्त्री नेमकी असते तरी कशी महिलांना राजकारणात स्वातंत्र्या नंतर संधी मिळाली आणि स्त्रियांनी हळू हळू त्या संधीचं सोनं केलं . अशीच एक राजकारण ,समाजकारण आणि गृहिणी अशा भूमिका पार पाडणा-्या स्त्री बद्दल आपण जाणून घेऊ .जयश्री निलेश पावडे हे नाव आज राजकारणाच्या पटलावर स्थिरावले ते नांदेड नगरीचे महापौर म्हणून . कार्य कुशलता ,संघटन कौशल्य ,विनम्रता हे गुण राजकारणासाठी महत्त्वाचे असतात .तसे प्रशासनाचे गुण देखील असणे फार महत्वाचे असतात .एखाद्या व्यक्तीकडे अनेक गुणांची जंत्री असली की त्या चे व्यक्तिमत्व उठावदार होते ..तसे बहु पेडी व्यक्तिमत्व या महिलेला लाभले आहे

.नगरसेविका म्हणून त्याचे कार्य उत्तम होतेच पण नगरसेवक एका भागाचा असतो महापौरांकडे शहराच्या अनेक गरजा ,समस्या सोडवून मागील कामे आणि स्वत:ची दृष्टी वापरून समाजूपयोगी टिकाऊ कामे करायचे असते . ही दृष्टी उपजतच असल्याने अनेक कामे मार्गी लागत आहे .रस्ते ,वीज ,पाणी ,कचरा या मूलभूत गरजा शहराच्या वाढीबरोबर दिवसागणिक वाढत जातात पण प्राधान्य क्रम त्यांना उमजला आणि त्यांनी कामाची घडी नीट बसवली .

गरीब मुलांना शिक्षण देणा-्या मनपा शाळा ,दवाखाने, पथदिवे यावर लक्ष केंद्रित करून वाटचाल सुरू आहे .शहराला नवा चेहेरा द्यायचा असेल तर शहर सुंदर असले पाहिजे .त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले .वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी काही मौलिक सूचना केल्या त्या सूचना मनपा ने स्वीकारल्या आणि तशी सुरुवात झाली .भिंती बोलू लागल्या .त्यावरची चित्र सौंदर्य आणि संवाद करू लागले .परस बाग निर्मिती आणि कच-याचे निर्मूलन अशी अनोखी स्पर्धा वेधक ठरली .निवारागृहांचे कामकाज समजून घेत तिथे आश्रयाला येणा-या बेघराना दिलासा देण्याचे काम असो अथवा गरोदर महिलांना सोसाव्या लागणा-ाा अडचणी असो एक महिला महापौर म्हणून जयश्री निलेश पावडे यांचे काम वाखाणण्याजोगे आहे .

प्रशासनात त्यांचा दबदबा आहे .स्वत: समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचे निराकरण करणे .शहराच्या समस्या वेगाने सोडवाव्यात यासाठी महापौरानी एक नंबर उपलब्ध करून दिलाय .लोक थेट आपली समस्या नोंदवू शकतात आणि त्यावर जलद गतीने कार्यवाही केली जाते .गुरुकुल पब्लीक स्कुलच्या अध्यक्ष ,अनेक सामाजिक संस्थेच्या सक्रिय सदस्य असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे .

या माध्यमातून समाजसेवा सुरू आहे . हे सगळे सुरू असताना त्याचे गृहिणी पद त्या अगदी आनंदाने करतात .सामान्य स्त्रिया जशा आपल्या मुलांबाळाचा विचार करतात तशाच आहेत त्या . कार्यालयात महापौर म्हणून काम करणारी ही महिला आपल्या कुटुंबात वावरताना आई ,पत्नी ,सून म्हणून वावरते . पद आज आहे ,उद्या नसेल. मी माझं महापौर पद हे काही काळासाठी आहे हे विसरत नाही असे त्या म्हणतात .एक निगर्वी ,अभ्यासू आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व म्हणून नांदेडकर मॅडमना ओळखतात .वेळ पडली तर मै नारी नही ,चिंगारी हू अशी धडाडी खरोखर वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल .

– आशा पैठणे

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − 5 =

Close