August 19, 2022

‘जयभीम’च्या गजराने नांदेड शहर दुमदुमले!

Read Time:2 Minute, 53 Second

नांदेड: प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रेल्वेस्टेशन परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गेल्या दोन वर्षानंतर कोरोनाची बंधने शिथील झाल्यामुळे न भूतो न भविष्यती असाच हा जनसागर होता. यावेळी जयभीमच्या घोषणेने नांदेड शहर दुमदुमले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गुरुवारी पहाटेपासून अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांसह महिलांनी गर्दी केली होती. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचे दिसून आले. गुरुवारी पहाटेपासून रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावून दर्शन घेतले.

यावेळी आ.अमर राजूरकर, माजी आमदार डी.पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरलकर, आनंद चव्हाण, आ.मोहन हंबर्डे, नगरसेवक महेंद्र पिंपळे, दयानंद वाघमारे, ओमप्रकाश पोकर्णा, विरेंद्रसिंग गाडीवाले, सुभाष रायबोळे, विजय येवनकर, अ‍ॅड.निलेश पावडे, मनपाचे अति. आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अति. आयुक्त गिरीश कदम, इंजि. प्रकाश कांबळे, इंजि. बाशेट्टी, जि.प.चे शिक्षण सभापती संजय बेळगे, अ‍ॅड.धम्मा कदम, मंगेश कदम, यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − seven =

Close