जबरी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला


नांदेड(प्रतिनिधी)-रेणुकाई हॉस्पीटल जवळून एका महिलेच्या गळ्यातील गंठण जबरीने तोडणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले असून त्याच्याकडून 44 हजार 895 रुपयांचा ऐेवज जप्त केला आहे.
3 जुलै रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार 7 जून 2024 रोजी रेणुकाई हॉस्पीटलजवळ एका महिलेच्या गळ्यातील गंठण दोन जणांनी जबरीने चोरले होते. तो गुन्हेगार गोवर्धनघाट परिसरात आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. पकडलेल्या चोरट्याचे नाव शेख माजीद शेख हुसमान(20) असे आहे. त्याच्याकडून चोरून नेलेल्या गंठणातील तुकडा व मंगळसूत्र असा 44 हजार 895 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्हेगाराला गुन्हा क्रमांक 84/2024 च्या तपासासाठी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी या चोरट्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार बालाजी यादगिरवाड, विठ्ठल शेळके, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड, विलास कदम, हनुमानसिंह ठाकूर आदींची कौतुक केले आहे.


Post Views: 67


Share this article:
Previous Post: रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान

July 3, 2024 - In Uncategorized

Next Post: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शासनास जमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

July 4, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.