जग तिस-या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर

संयुक्त राष्ट्रे : लसीकरणाचा वेग वाढू लागलेला असतानाच जगभरात कोरोनावर हळूहळू नियंत्रण मिळू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, हे चित्र काही देशांतच आहे. जगभरात अजूनही कोरोना ठाण मांडून बसला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी दुर्दैवाने आपण कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे तिस-या लाटेचा धोका अटळ मानला जात आहे.

एकीकडे काही देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला असताना अनेक देशांत लसींचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोना डेल्टा व्हेरिएंटने १११ देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत. दुर्दैवाने आपण कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत, असे टेड्रॉस यांनी स्पष्ट केले. डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने होणारा प्रसार, अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा होऊ लागलेली गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा योग्य प्रकारे प्रभावीपणे न होणारा वापर या गोष्टी कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू पुन्हा वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आता पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू फैलावू लागला असून तो सातत्याने अधिकाधिक वेगाने प्रसार होऊ शकणारी त्याची रुपे बदलतो आहे, असा इशाराही डॉ. टेड्रॉस यांनी दिला. हा डेल्टा व्हेरिएंट तब्बल १११ देशांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे लवकरच तो धोकादायक रूप घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या सलग ४ आठवड्यांमध्ये जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यासोबतच १० आठवडे सातत्याने कमी झाल्यानंतर कोरोना मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

लसपुरवठ्यात धक्कादायक भेदभाव
डॉ. टेड्रॉस यांनी कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीचे लक्ष जगभरात लसपुरवठ्यामध्ये केल्या जाणा-या भेदभावाकडेदेखील वेधले आहे. सध्या जगात वेगवेगळ्या देशांना लसपुरवठा करण्यात धक्कादायक असा भेदभाव केला जात असून जीवनावश्यक सामग्रीच्या उपलब्धतेमध्येदेखील देशादेशांमध्ये असमानता दिसून येत आहे, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + twelve =

vip porn full hard cum old indain sex hot