
छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी स्वराज्य संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडली- माजी अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे
बिलोली: छत्रपती शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजे म्हणून केलेला कार्योउद्गार संविधानात आढळतो.शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डॉ.बाबासाहेबांच्या संविधानातून प्रतीत होते.त्यामुळे शिवराय व भीमराया हीच विचारधारा परिवर्तन घडवू शकते असे प्रतिपादन मा. अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने केले.
तालुक्यातील हिप्परगा माळ येथे 6 जून रोजी शिवस्वराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मा. अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यांची संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडली असून छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य, देशापुरते मर्यादित नसून या राज्याची राजनीती आणि लोककल्याणकारी कार्य आज जगात अभ्यासली जातात.कल्याणकारी म्हणजे सर्व गरीब,दुबळे,पीडती,बहुजन या सर्वांचे कल्याण कल्याण आणि कल्याणच होय.असे प्रतिपादन मा. अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांनी व्यक्त केले.यावेळी यावेळी सरपंच तिरुपती डाकोरे,कमलादेवी सेवा फाऊंदेशनच्या अध्यक्षा वंदना बाबुराव कांबळे,महती फाउंडेशनच्या संचालिका काजल कोथळीकर,संघरत्न निवडंगे आदीची उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर येथील वक्त्या काजल कोथळीकर, सप्नील कऱ्हाडे यांचीही भाषणे झाली. यावेळी कमलादेवी सेवा
फाउंडेशन कडून कोरोना काळात जनसेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना छत्रपती शाहू महाराज कोरोना वीर हे प्रमानपत्र देऊन गौरवण्यात आले.सरपंच तिरुपती मारोतीराव डकोरे
संतोष दासवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव सदस्य,गणेश पांचाळ, रुक्मिणीबाई डाकोरे सावित्रीबाई दासवड, अर्चना ईबीतदार,हानमाबाई रानवक्कर , ग्रामसेवक आर.एन. मुंगल,
राजेश पाटील डाकोरे ,चेअरमन
विकास सोंडरे, व सर्व गावकरी उपस्थित होते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामसुंदर जाधव यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.