January 25, 2022

चीनी कंपन्यांची महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही

Read Time:2 Minute, 7 Second

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरवरील परिस्थिती पाहता भारत चीनी कंपन्यांना संयुक्त उपक्रमांसह महामार्ग प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ देणार नाही, असे गडकरी जुलै २०२० मध्ये म्हणाले होते.

त्यानंतर कोणत्याच चीनी कंपनीने भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते, त्यानंतर गडकरी यांनी चीनी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू देणार नाही, असे स्पष्ट केले होते.

भारताला निर्यातीवर भर द्यावा लागणार
येत्या काळात भारताला आपली निर्यात वाढवावी लागेल आणि आयात कमी करावी लागेल. तरच देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल, असेही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले. मुलाखतीत गडकरी इतरही विषयांवर बोलले आहेत. वाहनांवरील आयात शुल्कासंबंधीत प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार टेस्लाच्या भारतातील इलेक्ट्रिक वाहनांवरील (ईव्ही) आयात शुल्क कमी करण्याच्या मागणीबद्दलचा निर्णय हा अर्थ मंत्रालय घेईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + fifteen =

Close