चीनमध्ये कोरोनाचे थैमान

Read Time:2 Minute, 21 Second

बीजिंग : बीजिंगमध्ये कोविड-१९ ने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. चीनच्या राजधानीच्या मध्यवर्ती जिल्ह्यांमध्ये कोविडचा पुन्हा प्रसार झाला आहे, जिथे अधिका-यांनी एक मॉल सील केला आहे आणि अनेक निवासी संकुले बंद करण्यात आली आहेत. त्याचवेळी ईशान्य चीनच्या डालियानमध्ये कोविडची ५२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे चीनची झोप उडाली आहे.

चीनने मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन, कोविडच्या चाचण्या आणि प्रवासाला निर्बंध लादून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखला. परंतु गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासामुळे झालेल्या संसर्गामुळे अधिकारी हाय अलर्टवर आहेत. काल सकाळी बीजिंगच्या चाओयांग आणि हैदियानमध्ये सहा नवीन रुग्ण आढळले आहेत. स्थानिक मीडियाने वृत्त दिले आहे की, ही नवीन प्रकरणे ईशान्य जिलिन प्रांतात नुकतीच संक्रमित झालेल्या लोकांच्या जवळची आहेत. बीजिंग यूथ डेलीच्या वृत्तानुसार बुधवारी डोंगचेंगमधील रॅफल्स सिटी मॉल सील करण्यात आला. कारण कोविडची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या जवळची व्यक्तीने त्या मॉलमध्ये गेली होती.

बीजिंगमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाचा ताजा संसर्ग समोर आला. बीजिंगच्या आरोग्य अधिका-यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील २८० हून अधिक व्यक्तींची ओळख पटली आहे. चाओयांग आणि हैदियान जिल्ह्यात सुमारे १२ हजार लोकांची चाचणी घेण्यात आली असून, पुन्हा निर्बंध वाढविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × five =