चीनमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती

Read Time:5 Minute, 7 Second

लंडन: कोरोना संसर्गानंतर जगभरात कहर निर्माण झाला आहे. अमेरिका व इंग्लंडने याबाबत वारंवार चीन हाच कोरोना विषाणूचा निर्माता असल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत चीनने त्याचे वारंवार खंडन केले आहे. मात्र आता डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी गतवर्षी चीनमधील वुहान येथील विषाणूविषयक प्रयोगशाळेची पाहणी केली असता त्यांना तेथे विषाणूमधील एक युनिक फिंगरप्रिंट सापडले आहेत. परिणामी चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणूची कृत्रिमपणे निर्मिती करण्यात आली हे सिद्ध होत आहे. फिंगरप्रिंट सापडल्याने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेवर ब्रिटन-अमेरिका दबाव टाकत असल्याचे समजते आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनानुसार, चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत तयार केला असल्याचा दावा केला जात आहे. विषाणू तयार केल्यानंतर या विषाणूला रिव्हर्स इंजिनियरिंग व्हर्जनने लपवण्याचा प्रयत्न केला. विषाणू वटवाघळांपासून निर्माण झाल्याचे दाखवण्यासाठी हा खटाटोप केला, असा दावा केला जात आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करणाºया गुप्तचर यंत्रणांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अमेरिकेवर आरोप लावताना त्यांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची उत्पत्ती झाली असावी असा दावा केला आहे.

युरोपिअन शास्त्रज्ञांचा दावा
ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गालिश आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी हे संशोधन केले आहे. आपल्याकडे एक वर्षाहून अधिक काळापासून चीनने रेट्रो-इंजीनिअरिंगचे पुरावे असल्याचा दावा दोघांनी केला आहे. अनेक तज्ज्ञांनी आणि प्रख्यात वैद्यकीय, संशोधन नियतकालिकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी म्हटले. प्रा. डल्गालिश हे लंडन येथील सेंट जॉर्ज विद्यापीठात कर्करोग विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांना एचआयव्ही वॅक्सिन तयार करण्यासाठी ओळखले जाते. तर, नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. सोरेनसेन हे महासाथ रोग तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय ते इम्युनर कंपनीचे अध्यक्ष असून कोरोनावर लस तयार करत आहेत.

वुहान प्रयोगशाळेतील डेटा जाणीवपुर्वक नष्ट
चीनने वुहान लॅबमधील प्रयोगाशी संबंधित डेटा जाणूनबुजून नष्ट केल्याचा आरोप या शास्त्रज्ञांनी केला आहे. ज्या शास्त्रज्ञांनी याबद्दल आवाज उठविला, त्यांना चीनच्या यंत्रणेने गप्प बसवले अथवा त्यांना गायब केले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

युनिक फिंगर प्रिंट आढळले
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षी दोन्ही शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी कोरोनाच्या नमुन्यांचा अभ्यास करत होते. तेव्हा, त्यांनी विषाणूमधील एक युनिक फिंगरप्रिंट शोधले. प्रयोगशाळेत विषाणूमध्ये बदल केल्यास असे युनिक फिंगरप्रिंट आढळू शकतात असे त्यांनी म्हटले. हे अभ्यास संशोधन प्रकाशित करण्याचे प्रयत्न केले. मात्र, अनेक नियतकालिकांनी याला नकार दिला. कोरोनाचा विषाणू हा वटवाघूळ अथवा एखाद्या प्राण्यांमधून माणसांच्या शरीरात आला असावा असे त्यांचे मत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − 9 =