August 9, 2022

चिनी माल आयातबंदीमुळे ५० हजार कोटींचा फटका

Read Time:2 Minute, 32 Second

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच भारतीय नागरिकांनी चीनचे दिवाळे काढले आहे. कारण दिवाळीपूर्वीच चिनी मालावर आयातबंदी केलेली आहे. देशात चायना मालावर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसला असून, चीनचे तब्बल ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशात चायना मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केल्याने यंदाच्या सण उत्सवाच्या तोंडावर चीनला व्यापारात ५० हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यंदा घरगुती स्तरावर ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेत २ लाख कोटी रुपयांचा अंदाज आहे. दरम्यान गतवर्षीप्रमाणे यंदाही कॅटने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशातील व्यापारी आणि आयातकर्त्यांनी चीनमधून आयात बंद केली आहे. त्यामुळे चीनला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.

कॅटने जारी केलेल्या अंदाजानुसार देशभरात ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे, त्यामुळेच व्यापारी वर्गाला मोठ्या आर्थिक उलाढालीची अपेक्षा यंदाच्या उत्सवातील खरेदी-विक्रीतून आहे. दिवाळी कालावधीतील खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या वर्षी २ लाख कोटी रुपयांची भर अर्थव्यवस्थेत पडेल, अशा अंदाज कॅटने व्यक्त केला आहे. दरम्यान, चिनी मालाची आयात बंद केल्याने चीनला तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा फटका बसला. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे गेल्यावर्ष भरापासून ग्राहकांनीही चायना मालाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वदेशी, भारतीय सामानास बाजारात चांगली मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + 16 =

Close