चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

Read Time:3 Minute, 4 Second

हदगाव : तालुक्यातील मरडगा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हदगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरडगा येथील संजय दत्तराव काळे यांच्यासोबत सगुना उर्फ गायत्री हिचा विवाह दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी साध्या पद्धतीने पार पडला होता. हा विवाह सगुना उर्फ गायत्रीचे मामा रामदास बबनराव अवचार राहणार भोसी यांनी विवाह साध्या पद्धतीने रितीरिवाजा केला होता. पण संजय दत्तराव काळे यांचा या अगोदर एक विवाह झाला होता.

त्या विवाहातून त्यांना घटस्फोट सुद्धा मिळाला होता, गायत्री सोबत त्यांचा हा दुसरा विवाह होता, तो आपल्या पत्नीवर नेहमी संशय घेत असे व तुझ्या मामा कडून पैसे घेऊन ये, म्हणून वारंवार तगादा लावत असे. हे सर्व प्रकार सगुना उर्फ गायत्री हिने नागपंचमी सणाच्या निमित्ताने आपल्या मामाच्या गावी आल्यानंतर आपल्या मामाला सांगीतला. मध्यस्थीने राखी पौर्णिमा झाल्यानंतर पाठवणी केली. दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गायत्रीच्या सास-्याने फोन केला व तुमची भाची सगुणा उर्फ गायत्री ही चक्कर येऊन पडली आहे, आम्ही तिला बाळापुर येथे सरकारी दवाखान्यात आणत आहोत, तुम्ही लवकर या, असा फोन केला.

रुग्णालयात गेल्यानंतर मामाने तेथील डॉक्टराकडे विचारपूस केली असता डॉक्टर यांनी सगुना उर्फ गायत्रीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे असे सांगितले असता दवाखान्यांमध्ये हजर असणारे पती, सासरा व दीर हे तिथून निघून गेले. सगुना उर्फ गायत्रीची उत्तरीय तपासणी करून प्रेत ताब्यात घेऊन हदगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली पोलीस उपनिरीक्षक फोलाने यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ पती व दिरास अटक केली असून सासरा, सासू व जाऊ असे तीन आरोपी फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + five =