चलाहवायेउद्या या सांस्कृतिक मेजवानी…

Read Time:3 Minute, 27 Second

नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून #चलाहवायेउद्या या सांस्कृतिक मेजवानीचे व अवघ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व विनोदकलेने परिपूर्ण असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. चला हवा येऊ द्या च्या संपूर्ण टीमने नांदेडकर प्रेक्षकांना ताण, तणाव, विसरून खळखळून हसायला भाग पाडले, आपल्या उत्तम विनोदी शैलीने मा.Bhau Kadam Shreya Bugde Sheth Bharat Ganeshpure कुशल बद्रिके व ईतर कलाकारांनी उपस्थित व दूरचित्रवाणीद्वारे कार्यक्रम पाहणाऱ्या संपूर्ण नांदेडकर जनतेची मने जिंकली खऱ्यार्थी हा कार्यक्रम कोव्हीड मुळे गेली दोन वर्षे ज्या लोकांच्या चेहऱ्यावरिल हास्य कुठेतरी अदृश्य झाले होते ताण तणावाखाली जरा देखील हसू नव्हते त्या लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्यासाठी आयोजित करण्यात आला व त्या लोकांना नैराश्यातून पुन्हा हास्याकडे परावर्तित करण्यासाठी ‘बूस्टर डोस’ ठरला हे बोललं तर वावगे ठरणार नाही. राज्याचे लोकनेते सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे लोकप्रिय व यशस्वी पालकमंत्री मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली महापालिकेने रौप्यमहोत्सवी वर्षे साजरे केले. महापालिकेचे २५” वे वर्षे साजरी करत असताना कला, साहित्य, विज्ञान, सांस्कृतिक, अश्या विषयांवर महापालिकेने भर देत नांदेड च्या कला वैभवात वृद्धी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सदर कार्यक्रमास पालकमंत्री लोकनेते मा.ना.श्री.Ashok Chavan- अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी खासदार मा.श्री.भास्कररावजी पाटील खतगावकर दादा, राज्याचे माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत साहेब, विधानपरिषदेचे गटनेते आमदार मा.श्री.अमरभाऊ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मा.श्री. मोहनराव अण्णा हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष Adv.Nilesh N. Pawde -निलेशरावजी पावडे जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधी, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी माजी महापौर नगरसेवक, नगरसेविका, व विशेषतः लाखो नांदेडकरांची उपस्थिती या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.. !!

– सौ.जयश्री निलेश पावडे
महापौर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + three =