चक्रीवादळाचा रुद्रावतार !

मुंबई : तौत्के चक्रीवादळाने हळूहळू रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण झाले. मात्र, आता त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, केरळ, तामिळनाडूत त्याचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात आढावा घेतला आहे.

केरळच्या किनारपट्टी भागात तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. केरळमध्ये वा-याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाच जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून, सध्या वा-याचा वेग प्रचंड वाढला आहे. किना-यावर येऊन आदळणा-या लाटांचा तडाखा तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला बसला आहे. वलियाथुरा येथील ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचे नुकसान झाले आहे. समुद्राच्या लाटा आदळत असल्याने पुलाला तडे गेले आहेत.

मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलाचे नुकसान झाले होते. पुल वाकला असून त्यामुळे पुलाकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
अलिबाग-अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौत्के चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ कोकण किनारपट्टीवरून रविवारी गुजरातच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळेमहाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही दक्षता घेतली जात आहे. कोकण किनारपट्टीलगत असलेल्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, चक्रीवादळासंबधी गावोगाव जनजागृती केली जात आहे.

गुजरातमध्येही धडकणार
अरबी समुद्रातील चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून जवळपास तीनशे किमी अंतरावर आहे. येणा-या कालावधीत त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याचा अंदाज असून, अरबी समुद्रातून याचा प्रवास सुरू होईल आणि गुजरातच्या किनारपट्टीवर १८ मे रोजी धडकेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दूरपासून हे वादळ जात असले, तरी त्याचा परिणाम होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

‘मुंबईच्या किनारपट्टीवर एनडीआरएफ’च्या तुकड्या
सध्या अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत या चक्रीवादळाचा परिणाम दिसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर १४ तुकड्या अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

समुद्र किनारे बंद, मासेमारीवर निर्बंध
रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे बंद ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मच्छिमारांना मासेमारीसाठी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वादळाचा वेग वाढणार
चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर-वायव्य दिशेला सरकत आहे. या चक्रीवादळाचे रुपांतर ६ तासांत तीव्र चक्रीवादळात होणार आहे, तर त्यापुढील १२ तासांत अतिजास्त तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता असून, ते १८ मे रोजी दुपारनंतर केव्हाही गुजरातमध्ये धडकू शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + nineteen =

vip porn full hard cum old indain sex hot