चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 10 Second
नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल फेकून मारल्याचा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात येथे घडला.
Advertisements
मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे रा. विष्णुपुरी याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली असता न्यायाधीशांच्या समोरील काचा वर लागली.
दरम्यान तात्काळ या घटनेची गंभीरता पाहता न्यायाधीश बांगर यांनी सदर कुख्यात आरोपीला ६ महिने शिक्षा आणि दंड १००० रुपये दिला आहे. आरोपी या पूर्वी मकोकामध्ये असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
Advertisements