चंद्रकांत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Read Time:2 Minute, 10 Second


मुंबई | मी अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हंटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थिनींचे आणि संस्थेचे अभिनंदन करून पाटील म्हणाले, महिला मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मुलींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

जन्माला येणारा प्रत्येकजण कधी ना कधी निवृत्त होतोच. आगामी काळ मुलींचा आहे, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. मी देखील अजून दहा ते बारा वर्षेच काम करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. पाच दहा वर्षानंतर कशाला? आताच निवृत्ती घ्या, या शब्दात एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

वेळेच्या आधी म्हातारं व्हायचं नसेल, आत्ताच बंद करा ‘या’ 4 गोष्टी

भारतात लाँच झालेल्या 5G साठी तुम्हाला मोजावे लागतील ‘इतके’ पैसे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − 1 =