चंद्रकांत खैरेंचा एकनाथ शिंदेंना गंभीर इशारा, म्हणतात…

Read Time:1 Minute, 40 Secondमुंबई | शिंदे गटाच्या वकिलांच्या मागणीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारंख आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारण्यासारखं आहे. तसा प्रयत्न कोणीही करू नये. तसं झाल्यास शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिला आहे.

परवानगी मिळाली तरी देखील आणि नाही मिळाली तरीही शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. कोणीही मैदान गोठवण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांच्या अंगलट येईल, असा इशाराही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

 थोडक्यात बातम्या- 

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

“उद्धव ठाकरे सेना भवनात जितके शोभून दिसतात तितके…”Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 3 =