घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा

Read Time:58 Second

नांदेड : विनापरवाना तलवारी, खंजर यासह अन्य अशी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि.१६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

शहरातील नंदीग्राम सोसायटी येथे राहणा-या एकाजवळ प्राणघातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ६ हजार रुपये किंमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 + ten =