‘घरात पार्टी सुरू असताना शाहरूख मात्र…’, गौरी खानचा नवऱ्याबद्दल मोठा खुलासा

Read Time:1 Minute, 40 Second


मुंबई | सुपरस्टार शाहरूख खानची(Shahrukh khan) पत्नी गौरी खाननं(Gauri khan) नुकतंच ‘काॅफी विथ करण'(Coffe With Karan) या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये गौरीसोबत अनन्या पांडेची आई भावना पांडे तसेच संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती.

शोमध्ये बोलताना गौरीनं शाहरूख विषयीच्या काही वाईट गोष्टी सांगितल्या. गौरी म्हणाली, जेव्हा घरात पार्टी असते, तेव्हा शाहरूख गेस्टची वाट बघत बसतो. यासाठी तो सारखा घराच्या बाहेर जात असतो.

तसेच शाहरूख गेस्ट जातानाही ते गाडीत बसेपर्यंत पाहत असतो. त्यामुळं घरात पार्टी असली तरी असं वाटतं की पार्टी घराच्या बाहेर सुरू आहे. शाहरूखची ही सवय आधीपासूनच आहे, असंही गौरी यावेळी म्हणाली.

दरम्यान, या शोमध्ये गौरीला, मुलगी सुहानाला डेटींगबाबत काय सांगाल ?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गौरी म्हणाली, एकाच वेळी दोन मुलांना डेट करू नको, असं मी तिला सांगेन.

थोडक्यात बातम्या-

‘एवढा लाळघोटेपणा करणारा आमदार…; किशोरी पेडणेकर आक्रमक

‘काॅंग्रेसला बरोबर घेऊ नये…’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + eleven =