घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा, म्हणतात…

Read Time:2 Minute, 5 Second


मुंबई | सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी धक्का वगैरे नसल्याचा दावा घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे.

नेमका कोणाचा पक्ष खरा आहे हे ठरवण्याचे आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला तरी पुन्हा त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता येते. त्यामुळे आजच्या निर्णयाने सगळे काही संपलंय असं काही नाही, असं उल्हास बापट यांनी सांगितलंय.

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील एका पक्षाचे चिन्ह कोणाला मिळते, हा माझ्या मते फार मोठा प्रश्न नाही. मात्र आमदारांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो देशातील लोकशाहीच्या दृष्टीकोनातून खरा कळीचा मुद्दा आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या”

देशातील सर्वात स्वस्त, जबरदस्त Electric Car लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × three =