ग्रीन बेल्ट सुखावला; मांजरा धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ

Read Time:2 Minute, 46 Second

कळंब तालुक्यात मंगळवारी ही सूर्यदर्शन झाले नाही,दिवसभर सर्वदूर पाऊस झाला. मांजरा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मांजर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.या मुळे धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे.या मुळे ग्रीन बेल्ट मधील शेतकरी सुखावले आहेत. तालुक्यात सर्वदूर झालेल्या मुरपावसामुळे विंधनविहिरी,कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

मागच्या आठ दहा दिवसापासून प्रदीर्घ विश्रातींतर पावसाने सुरवात केली आहे..बहुतांश भागात रविवार पासून मुर पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे विहिरी,कुनलिकेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसामुळे शेतीची मशागतीची कामे थांबली आहेत. मंगळवारी तालुक्यात पावसाने सकाळ पासून च हलक्या स्वरूपात हजेरी लावली.मुर पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

लातूर,अंबाजोगाई,कळंब,केज,धारूर आदी गावासाठी पाणी पुरवठा करणारे मांजरा प्रकल्प या वेळी ही पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची चिन्हे आहेत. ,कळंब तालुक्यातील बहुला,खोंदला, आथर्डी,भाटसांगवी कळंब शहराला खेटून गेलेली मांजरा नदी होय.या नदीचे उगमस्थान भूम,जामखेड,खर्डा परिसरातून झाल्याचे सांगण्यात येते.सोमवार पासून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे मांजरा प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरण्याचे संकेत मिळत असून मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

मांजरा प्रकल्प 7 सप्टेंबर 2021 स्थिती

एकूण साठा – 134.010 दलघमी
उपयुक्त साठा – 86.880 दलघमी
पाणी पातळी – 639.80 मी

एकूण साठा – 59.80%
उपयुक्त साठा – 49.10%
1/6पासून आवक – 62.293 दलघमी

– प्रकल्पीय माहिती –
एकूण साठा – 224.09 दलघमी
उपयुक्त साठा – 176.96 दलघमी
मृत साठा – 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी – 642.37 मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =