ग्राम विकास अधिकाऱ्याची लुट – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-तुप्पा येथील ग्राम विकास अधिकाऱ्याला 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता लातूरफाटा येथे रोखून दोन जणांनी त्यांच्याकडून 3 लाख 32 हजार 600 रुपयांची लुट केली आहे.
ग्राम विकास अधिकारी तुप्पा शिवराज रामदास तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता लातूर फाटा रस्त्यावरील हॉटेल आदित्यसमोरून ते जात असतांना दोन जणांनी त्यांची गाडी रोखली. तांबोळी यांच्यासोबत सुध्दा त्यांचे मित्र होते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 44 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, दुसऱ्या मित्राचा 32 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या 1 लाख 21 हजार 600 रुपयांच्या, तसेच दोन तोळे सोन्याचे लॉकेट 90 हजार रुपये आणि खिशातील 45 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 32 हजार 600 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 506, 34 नुसार गुन्हा क्रमांक 267/2024 प्रमाणे नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 301


Share this article:
Previous Post: लोकसभा निवडणुकीत भाजपच्यावतीने बदनाम उमेदवार-ऍड.भोसीकर

April 1, 2024 - In Uncategorized

Next Post: शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून 9 लाख 75 हजारांची फसवणूक

April 1, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.